BIG SETBACK FOR SHARAD PAWAR AHEAD OF MUNICIPAL ELECTIONS AS RAMESH KADAM RESIGNS FROM NCP 
महाराष्ट्र

Municipal Elections: मतदानाच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का! निष्ठावंत नेत्याचा राजीनामा, निवडणुकीच्या आधीच पक्षाला मोठा झटका

Sharad Pawar NCP Politics: महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत पक्षांतरांची रेलचाल सुरू होती. मंगळवारी प्रचाराच्या तोफा थंड झाल्या असून, येत्या गुरुवारी (१५ जानेवारी) मतदान होणार आहे तर शुक्रवारी निकाल जाहीर होईल. या निवडणुकांमध्ये तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केल्याचे चित्र आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्येही असंच घडलं. अशा वातावरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून, शरद पवार यांचे खंदे समर्थक व माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

रमेश कदम हे १९८४ पासून राष्ट्रवादीत सक्रिय होते. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर पक्ष फुटला तेव्हा अनेक नेत्यांनी अजित गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला, मात्र कदम यांनी शरद पवार यांची साथ सोडली नव्हती. चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते पक्षातून नाराज झाले. पक्षात योग्य स्थान आणि सहकार्य न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा सादर केला. हा निर्णय महापालिका निवडणुकीच्या एक दिवस आधी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रमेश कदम यांच्या राजीनाम्याची पार्श्वभूमी म्हणजे निवडणूक आयोगाची मंगळवारी (१३ जानेवारी) झालेली महत्त्वाची पत्रकार परिषद. यात राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा करण्यात आली. येत्या ५ फेब्रुवारी रोजी या निवडणुकांसाठी मतदान होईल तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. या घोषणेनंतर लगेचच कदम यांचा राजीनामा आल्याने राजकीय विश्लेषकांकडून विविध तर्क लढवले जात आहेत. कदम यांचा हा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत इतर पक्षाकडे जाण्याचा संकेत असल्याचे मानले जात आहे.

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत पक्षांतरांचा उद्रेक झाला असून, राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा आणखी एक धक्का ठरला आहे. शरद पवार गटातील अंतर्गत कलह वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या घोषणेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची नवीन लाट सुरू होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्र राजकारणात नवीन चक्र सुरू झाले असून, पक्षांची रणनीती कशी घडेल यावर लक्ष केंद्रित झाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा