Malegaon Dongrale Crime 
महाराष्ट्र

Malegaon Dongrale Crime : मालेगाव प्रकरण; आज विधानसभेत होणार विशेष चर्चा

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एक धक्कादायक घटना घडली.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Malegaon Dongrale Crime) मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एक धक्कादायक घटना घडली. तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. खेळण्यासाठी बाहेर गेलेली चिमुकली खूपवेळ घरी आलीच नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केला. काही तासांनंतर घराच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानंतर रात्री उशिरा गावकऱ्यांना मोबाईल टॉवरशेजारी तिचा मृतदेह आढळला. चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने तिची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि अन्य अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी तत्काळ तपास सुरू करून विजय संजय खैरनार या तरुणाला ताब्यात घेतले.

आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मालेगावातील 3 वर्षीय मुलीवर अत्याचार, हत्या प्रकरणावर आज विधानसभेत विशेष चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

Summery

  • मालेगावातील 3 वर्षीय मुलीवर अत्याचार, हत्या प्रकरण

  • आज विधानसभेत होणार विशेष चर्चा

  • 24 वर्षीय नराधमाने अत्याचार करत केलेली मुलीची हत्या

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा