virar  Team Lokshahi
महाराष्ट्र

दांडिया खेळताना मुलाचा मृत्यू, धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण

शनिवारी रात्री घडली ही धक्कादायक घटना

Published by : Sagar Pradhan

संदीप गायकवाड। मुंबई: विरारमध्ये हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. दांडीया खेळताना मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूच्या धक्याने पित्याने आपले प्राण सोडले. मनीषकुमार जैन असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर नरपत जैन असं मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विरार पश्चिम ग्लोबल सिटी, अग्रवाल कॉम्प्लेक्स मधील एव्हरशाईन एव्हॅन्यू या सोसायटी मध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. मुलगा मनीषकुमार नारपथ जैन (वय 35), वडील नरपथ हरिश्चंद्र जैन (वय 65) असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या बाप लेकाचे नाव आहे.

शनिवारी रात्री आपल्या सोसायटी मध्ये गरबा खेळताना मुलगा मनीषकुमार जैन याला अश्वस्थ वाटायला लागले होते, तात्काळ रिक्षातून विरार च्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले पण दवाखान्याच्या मेडिकल जवळ जाताच मुलगा रिक्षातून खाली पडला, हे रिक्षात असलेल्या वडिलांनी पाहिले आणि तेही चक्कर येऊन खाली पडले.

डॉक्टर ने दोघा बापलेकाला तपासले असता या दोघीणचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत विरार च्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या घटनेची बातमी सोसायटी मध्ये कळताच राहिवाशानाही याचा मोठा धक्का बसला असून, जैन कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा