Manikrao Kokate  
महाराष्ट्र

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची प्रकृती स्थिर; आज डिस्चार्ज देण्याबाबत माहिती समोर येण्याची शक्यता

माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Manikrao Kokate) माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा आणि 10 हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आली आहे.

प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली ही शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवला आहे. या न्यायालयीन निर्णयामुळे कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला असून आता या खात्याचा पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार आहे.

नाशिक पोलिसांना माणिकराव कोकाटेंच्या अटक वॉरंटची प्रत प्राप्त झाली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे. यातच माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता माणिकराव कोकाटेंची प्रकृती स्थिर असून आज डिस्चार्ज देण्याबाबत माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Summery

  • माणिकराव कोकाटेंची प्रकृती स्थिर

  • कोकाटेंना उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास

  • आज डिस्चार्ज देण्याबाबत माहिती समोर येण्याची शक्यता

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा