जालना : सरकारच्या जीआरनंतरही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. जीआरमध्ये सुधारणा करुन सरसकट आक्षणाची मागणी त्यांनी केली आहे. तर, सरकारचे चर्चेचे आमंत्रण मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारले आहे. यानुसार जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे.
याबाबत बोलताना जरांगे पाटलांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. आमचं शिष्टमंडळ मुंबईत चर्चा करायला जातंय. सरकारच्या निरोपाची वाट पाहतोय. उद्यापासून पाणीही पिणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. तसेच, मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावं. कोणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असे आवाहनही मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केले आहे.