मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार. यात मी काहीच बदल करु शकत नाही. कुणीही आला तरी मी उपोषण करणार.
यासोबतच ते म्हणाले की, मी समाजाचं यासाठी ऐकत नाही की, मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा आहे. समाजाने पाठबळ माझ्या पाठिशी ठेवावं. समाजाने माझ्या पाठिशी राहावं आशीर्वाद द्यावे. मला काय अपेक्षा नाही. 4 तारखेचं उपोषण होणार आहे. त्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचं त्याचा प्रोग्रॅम समाजाला दिला जाईल. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.