महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : 70 वर्षात आम्हाला कुणी आरक्षण दिले नाही याचे उत्तर आम्हाला पाहिजे

मनोज जरांगे पाटील यांची सांगलीतली विटा येथे सभा पार पडली.

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांची सांगलीतली विटा येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण समजून घ्यायला वेळ लागला. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात. मराठा बांधवांनो आरक्षण समजून घ्या. आरक्षणासाठी एकजूट असावी. सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी. मराठवाड्यामध्ये एक चर्चा होती की पश्चिम महाराष्ट्रमधील मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, ते एकत्र येत नाही. ही खोटी बातमी ज्यांनी पेरली त्याने आज सांगली जिल्ह्यातील सभा पाहावी. ज्या जातीने आरक्षण समजून घेतले त्यांना लगेच आरक्षण भेटले.

एकजूट बघून सरकारने पुरावे शोधायला सुरुवात केली. आज प्रत्येक जिल्ह्यात लाखो मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. पश्चिम महाराष्ट्र बाबतीत एक चर्चा होती की, उशीर झाला की लोक सभेला थांबत नाही, हा पण रेकॉर्ड तोडला आज पश्चिम महाराष्ट्राने. एकही गाव नाही जिथे आज मला थांबवले जात नाही. मराठ्यांना डावलून जाणारी माझी औलाद नाही. मी सर्वांना भेटतो, म्हणून सभांना उशीरा पोहचतोय.

मराठा समाजातील सर्व राजकीय नेते एकत्र आल्यास फक्त दोन तासांत आम्हाला आरक्षण मिळेल. 70 वर्षांपूर्वी आरक्षण दिले असते तर मराठा समाज आज प्रगत जात झाली असती. 70 वर्षात आम्हाला कुणी आरक्षण दिले नाही याचे उत्तर आम्हाला पाहिजे. ओबीसी नेत्याचा दबाव होता, त्यामुळे पुरावे लपवले गेले. पण आज मराठाची एकजूट पाहून सरकारने पुरावे शोधायला सुरुवात केली. आरक्षण कुणी दिले नाही याचे नाव आम्हाला कळले पाहिजे. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते