मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने कल्याण पूर्व कोळशेवाडी पोटे मैदान येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन केले होते.
या सभेत जरांगे पाटलांनी म्हटले की, आमचा सरकारवर विश्वास आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 24 डिसेंबर रोजी मराठा समाजाला आरक्षण देतील. जर दिले नाही तर आम्ही 24 डिसेंबरनंतर याचा जाब विचारणार.
परंतु आम्हाला आशा आहे जे सरकार आहे त्या सरकारकडून जनतेला न्याय मिळेल. मुख्यमंत्री शंभर टक्के मराठ्यांना न्याय देतील आणि हे मात्र सत्य आहे. पहिले आम्ही त्यांच्यावर आनंदी नव्हतो परंतु आता समाधानकारक आहे. हे सरकार खूप स्पीडने काम करत आहे. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.