थोडक्यात
मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी
याप्रकरणी दोघांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतले
अंतरवाली सराटीत आज पत्रकार परिषद
(Manoj Jarange Patil ) मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
दोघे संशयित बीड जिल्ह्यातल्या गेवराई येथील असल्याची माहिती मिळत आहे. दोघांनी जरांगे यांना धमकी देत त्यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. त्यानंतर मनोज जरांगे यांच्या एका जवळच्या सहकार्याने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली.
याच पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे. या प्रकरणी मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेतून काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.