मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील राज्याचा दौरा करणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करत मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार आहे.
या महाराष्ट्र दौऱ्यात 1575 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. महाराष्ट्र दौऱ्यात 9 जिल्ह्यांमध्ये होणार 24 सभा पार पडणार आहेत. 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्याची सांगता होणार असून सरकारला 24 नोव्हेंबरची शेवटची तारीख देण्यात आली आहे.
मराठा समाजाशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची गरज आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र दौरा करत आहे. तसेच आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मारकापासून सुरुवात होणार आहे तर शेवट शेवगावमध्ये होणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.