थोडक्यात
मराठा आंदोलक मनोज जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलनाला देणार भेट
आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवणार
सकाळी 9 वाजता मनोज जरांगे आंदोलनस्थळी भेट देणार
(Manoj Jarange Patil ) शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्याकडून ट्रॅक्टरसह लाँग मार्च काढण्यात आला आहे. नागपूर वर्धा महामार्गावर ट्रॅक्टरने चक्का जाम करण्यात आला होता. रात्री रस्त्यावर ठिकठिकाणी चुली पेटल्या. शेतकऱ्यांनी संपूर्ण संसार रस्त्यावर मांडल्याचे पाहायला मिळाले.
कर्जमाफी, सातबारा कोरा आणि शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या महाएल्गार आंदोलनामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्याकडून ट्रॅक्टरसह लाँग मार्च काढण्यात आला आहे.
बच्चू कडू आंदोलनावर ठाम असून जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत हटणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर बच्चू कडू ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पाहायला मिळत असून आज मनोज जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनास्थळी भेट देणार आहे.
आंदोलनस्थळी भेट देऊन ते पाठिंबा दर्शवणार आहेत. सकाळी 9 वाजता मनोज जरांगे पाटील आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. यातच आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने दिलेला चर्चेचा प्रस्ताव बच्चू कडूंनी स्वीकारत आज मुंबईत बैठकीला जाण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती मिळत आहे.