महाराष्ट्र

मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट

Published by : Lokshahi News

मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती हे उद्या(२ सप्टेंबर) रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीकरिता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केले होते. संभाजीराजेंच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व कॉंग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत.

छत्रपती संभाजीराजे हे सुरूवातीपासून मराठा आरक्षण लढ्यात सक्रीय असून रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील राहिले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कुण्या एकाची नसून सर्व पक्षांनी एकत्र येऊन यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज संभाजीराजेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय हेव्यादाव्यांच्या पलीकडे जाऊन संभाजीराजे मोट बांधत आहेत.

संसदेत १२७ व्या घटनादुरूस्तीवर बोलत असतानाही संभाजीराजे यांनी आरक्षणाबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारची जबाबदारी स्पष्ट केली. या घटनादुरूस्तीनंतर मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागास ठरवून, असाधारण परिस्थिती सिद्ध करून ५०% च्या वरती आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळासह खासदार संभाजीराजे घेत असलेल्या राष्ट्रपतींच्या भेटीकडे सर्व राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhule Crime : 'ते' फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने 20 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Abu Azmi : मराठीच्या मुद्द्यांवरुन अबू आझमी संतापले म्हणाले की, "मराठीचा सन्मान आवश्यक, पण..."

Bharat Gogawale : अधिवेशनात भरत गोगावलेंचं स्वागतच "ओम भट् स्वाहा"ने ; आधी राग आणि नंतर एकच हशा, नेमकं काय घडलं ?

Mira Road MNS Morcha : "महाराष्ट्रात सर्वांना मराठी आलीच पाहिजे", मनसेच्या मोर्चात चिमुकल्याची घोषणा