महाराष्ट्र

पुण्यात मराठी अभिनेत्रीचा विनयभंग; अभिनेत्रीच्या घरी वेगवेगळे गिफ्ट पाठवले अन्.... पोलिसात गुन्हा दाखल

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात डर चित्रपटाची पुनरावृत्ती पाहायला मिळालीय.

Published by : shweta walge

पुण्यात डर चित्रपटाची पुनरावृत्ती पाहायला मिळालीय. मराठीतील एका अभिनेत्रीला तिच्या घरी वेगवेगळे गिफ्ट पाठवत एका व्यक्तीने सोशल मिडीयावरुन विनयभंग आणि धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी रघुवीर सिंगविरोधात स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

रघुवीर सिंग गुजर असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव असून गुजर उदयपूर राजस्थानचा राहणारा आहे. या प्रकरणी रघुवीर सिंग यांच्या विरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 वर्षेय मराठी अभिनेत्री ही पुण्यातील एका नामांकित परिसरात राहायला असून तिने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहै.

सोशल माध्यमातून तिची ओळख वाढवत आरोपी रघुवीर सिंगने आपण तुमचे चाहते आहोत तिच्या राहत्या घरच्या पत्त्यावर वेगवेगळे गिफ्ट पाठवून तिला डर चित्रपटातील डायलॉग मारत, तू मेरी बन सकती नही तो किसी की नही बन सकती असे म्हणत धमकावल आहे.

दरम्यान, या प्रकरणी आरोपी रघुवीर सिंग गुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून मराठी अभिनेत्री प्रचंड घाबरलेली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप