(Marathwada) राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाळ्यात नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात येत असतो.
नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात पुराचा धोका असतो. याच पार्श्वभूमीवर आता या नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यासाठी आता ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे. मराठवाडा पोलीस ड्रोनच्या मदतीने आपत्कालीन घोषणा करायची असेल तर ड्रोनची मदत घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
पावसाळ्यात गावांमध्ये पुरस्थितीच्यावेळी धोक्याचा इशारा देण्यासाठी घोषणा पोलीस करत असतात. मात्र वेळेत गावकऱ्यांपर्यंत वेळेत पोहचणे आवश्यक असते. अशा घोषणा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यास उत्सुक असल्याचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले. तसेच नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समितीमार्फत ड्रोन खरेदी करण्याची योजना असून परवानगी मिळाली की ड्रोन नदीकाठच्या भागात तैनात करण्यात येतील.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, अशा आठ जिह्यांचा समावेश आहे.