महाराष्ट्र

Alert! 'या' जिल्ह्यात कार्यालये, बँका, शाळांमध्ये मास्क अनिवार्य

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रशांत जगताप | सातारा : राज्यात सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविड 19 च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्रतिबंधात्मक उपायांची खबरदारी घेतली जात आहे. अशातच, साताऱ्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत. तसेच, नागरिकांना मास्क वापरण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी आणि उपायोजना राबवण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

तसेच, गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी जसे आठवडी बाजार, एसटी स्टॅंड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे या सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण