थोडक्यात
राजस्थानात प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग
20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर 16 प्रवासी गंभीर जखमी
राजस्थानमधील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर लागली आग
(Rajasthan) राजस्थानात प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जैसलमेरहून ही बस निघाल्यानंतर अचानक बसच्या मागील बाजूने धूर येऊ लागला. चालकाच्या ही बाब लक्षात येताच चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र लगेच या बसला आग लागली.
अचानक आग लागल्याने प्रवाशांनी घाबरुन जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उड्या मारल्या. प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली. एसी बसला लागलेल्या या आगीत 20 जणांचा मृत्यू झाला. तर, 15 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत असून अनेक जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
या बसमध्ये एकूण 57 प्रवासी होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.