थोडक्यात
भिवंडीच्या सरवली एमआयडीसीत भीषण आग
मंगलमूर्ती डाईंग कंपनीत भीषण आग
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
(Bhiwandi) भिवंडीच्या सरवली एमआयडीसीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी येथील मंगलमूर्ती डाईंग या कंपनीत भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळाली नाही आहे.