Chandrakant patil Birthday team lokshahi
महाराष्ट्र

Chandrakant patil Birthday : पुण्यात भाजपच्या बॅनर्सवरून माजी महापौरच गायब!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात अनेक ठिकाणी बॅनर्स

Published by : Shweta Chavan-Zagade

अमोल धर्माधिकारी | पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात अनेक ठिकाणी बॅनर्स (Banners) पाहायला मिळत आहे. शहर भाजपच्या (BJP) वतीने शहरातील विविध जागांवर मोठे बॅनर्स उभारण्यात आले होते. मात्र यात पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचाच फोटो गायब आहे. शहरातील विविध भाजप नेत्यांचे फोटो असताना महापौर राहिलेले मोहोळ यांचा फोटो का लावला नाही अशा चर्चां आता रंगू लागल्या आहेत.

10 जूनला भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच कोथरूडच्या आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी भाजपातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छांचे बॅनर्स लावले. या बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांचे फोटो आणि नावे दिसली. मात्र पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांचा फोटो सोडाच पण नावाचा देखील उल्लेख कुठल्याही बॅनर्स वर दिसला नाही. माजी महापौरांचाच फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला यामुळे भाजपमध्ये कुठला अंतर्गत वाद आहे का प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा