मुंबईत आज मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गांवर मेट्रोची चाचणी सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज या चाचणीला हिरवा कंदील दाखवणार आहेत. कोविड संकट आणि लॉकडाऊनमुळे धीम्या झालेल्या मुंबईला पुन्हा एकदा गती मिळणार आहे.
मेट्रो 2A – डीएन नगर ते दहिसर आणि मेट्रो 7- अंधेरी ते दहिसर या दोन मार्गांवर जी नवी मेट्रो धावताना दिसेल ती मेट्रो पूर्ण भारतीय बनावटीची आहे. शिवाय ही मेट्रो ड्रायव्हरलेस मेट्रो आहे. मुंबईच्या चारकोप डेपोमध्ये मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चं सध्याचं कारशेड आहे. याच ठिकाणाहून मेट्रोची पहिली फेरी केली जाईल. या चाचणीनंतर येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबईकरांच्या प्रवासासाठी मेट्रो खुली होणार आहे. मुंबईत पश्चिम उपनगरांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
नवे मेट्रो मार्ग?
मेट्रो 2A – डीएन नगर ते दहिसर
18.6 किमी चा मार्ग – तरतूद 6, 410 कोटींची, 2031 पर्यंत 9 लाख प्रवासी प्रवास करतील
मेट्रो 7- अंधेरी ते दहिसर
16.5 किमीचा मार्ग- तरतूद 6,208 कोटींची, 2031 पर्यंत 6.7 लाख लोक प्रवास करतील…