Mhada 
महाराष्ट्र

Mhada : म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीला कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस

म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत बोनससंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

  • यंदा प्रत्येक कर्मचाऱ्याला 25 हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय

  • म्हाडा प्राधिकरणाच्या अलीकडील बैठकीत बोनससंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला

(Mhada) दिवाळीपूर्वी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. यंदा प्रत्येक कर्मचाऱ्याला 25 हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

म्हाडा प्राधिकरणाच्या अलीकडील बैठकीत बोनससंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला होता. चर्चेनंतर सर्वसंमतीने 25 हजार रुपयांच्या बोनसला मंजुरी देण्यात आली होती. 2024 मध्ये कर्मचाऱ्यांना 23 हजार रुपये बोनस दिला होता. या वर्षी कर्मचारी संघटनांनी बोनस वाढवण्याची मागणी लावून धरली होती. काही संघटनांनी थेट 30 हजार रुपयांची मागणी केली होती. अखेरीस म्हाडा कर्मचाऱ्यांना 25 हजारांचा बोनस देण्याचे मंजूर करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी महापालिका कर्मचार्‍यांना 29 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा त्यात 500 ते 1 हजार रुपयांची वाढ होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना बोनसवाढीमुळे म्हाडाच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा