म्हाडाची 2025-26 च्या अर्थसंकल्पामध्ये 19,497 घरांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी 92902.76 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुंबई मंडळाअंतर्गत 9902 घरांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. राज्यभरात म्हाडाची 11 हजरांहून अधिक घरे कोकण मंडळात आहेत.
प्राधिकरणाच्या 2025-2026 च्या 15956.92 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व 2024-25 च्या 10901.07 कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. पुणे मंडळाअंतर्गत 1836, नागपूर मंडळाअंतर्गत 692, छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत 1608, नाशिक मंडळाअंतर्गत 91, अमरावती मंडळाअंतर्गत 169 घरे उभारण्यात येणार आहेत.
मुंबई मंडळातर्फे अर्थसंकल्पात वरळी, नायगाव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेसाठी 2800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जोगेश्वरी पूर्व येथील PMGP कॉलनी पुनर्विकास प्रकल्पासाठी 350 कोटी रुपये, वांद्रे पश्चिम येथील परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी 205 कोटी रुपये, गोरेगाव सिद्धार्थ नगर येथे सदनिका उभारणीसाठी 573 कोटी रुपये, परळच्या जिजामाता नगर येथील भूखंडावर मुले व मुलींच्या निवासासाठी वसतिगृह उभारणीसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद आहे.