महाराष्ट्र

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे यांना अटक; आज कोर्टात करणार हजर

Published by : Lokshahi News

तुषार झरेकर : पुणे | म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

सुपे यांनी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांना पैसे घेऊन पास केले असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांच्यानंतर आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी .ए . टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्या पिंपरी-चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रं सापडली होती.त्यामुळे टीईटीच्या परीक्षेत घोटाळा झाला असल्याचा पोलिसांचा संशय बळावला होता. गुरुवारी सकाळपासून तुकाराम सुपेंना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अखेर आज पुणे पोलिसांनी सुपे यांना अटक केली आहे.

जी. ए. टेक्नॉलॉजीकडे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वीस पोलीस भरती प्रक्रियेचीही जबाबदारी होती. त्याचबरोबर प्रितेश देशमुख प्रमुख असलेल्या जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे महाराष्ट्रातील तब्बल 20 जिल्ह्यांच्या पोलीस भरतीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळं या कंपनीकडून राबवण्यात आलेल्या सगळ्याच भरती प्रक्रियांबद्दल संशय निर्माण झालंय.

"मोदीजी पोलीस बाजूला ठेऊन जनतेत येऊन दाखवा", उद्धव ठाकरेंचा PM नरेंद्र मोदींना इशारा

"मुंबई-ठाण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघाची डरकाळी फुटली"; पदाधिकारी मेळाव्यात CM शिंदेंचं मोठं विधान

Skin Care: उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या...

Mother's Day 2024: मातृदिनाला आईसोबत नक्की भेट द्या 'या' धार्मिक स्थळांना

Daily Horoscope 11 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या संपत्तीत होईल भरभराट; पाहा तुमचे भविष्य