महाराष्ट्र

MIDC Server Hack | एमआयडीसीचा सर्व्हर हॅक, हॅकर्सकडून 500 कोटी रुपयांची मागणी

Published by : Lokshahi News

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation)म्हणजेच एमआयडीसी (MIDC) चा सर्व्हर हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसीचा सर्व्हर हॅक करणाऱ्या हॅकर्सकडून तब्बल 500 कोटींची मागणी करण्यात आली आहे. या हॅकर्सने Midc च्या अधिकृत मेल आयडीवर 500 कोटींच्या मागणीचा मेल केला आहे, अशी माहिती मिळत आहे.

गेल्या सोमवारपासून हा सर्व्हर हॅक झाल्याने एमआयडीसीच्या कार्यालयांतील कामकाज बंद पडले आहे. यात मुंबई शहरातील मुख्य कार्यालयांसह प्रादेशिक कार्यालयांचा समावेश आहे. या सर्व कार्यालयांमधील कामकाज ठप्प आहे. डेटा जर पूर्णपणे परत मिळवायचा असेल तर 500 कोटी रुपये द्या. अन्यथा सर्व डेटा नष्ट करु अशी धमकी हॅकर्सनी दिली आहे.

संपूर्ण कामकाज ठप्प

एमआयडीसीशी संबंधित सर्व औद्योगिक वसाहती, उद्योजक, शासकीय घटक आणि विविध योजनांची संपूर्ण माहिती ही एका ऑनलाईन सिस्टिमवर आहे. या सिस्टिम सर्व्हरचा डेटा हॅक झाला आहे. त्यामुळे गेल्या सोमवारपासून संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. एमआयडीसीतील कॉम्प्युटर सुरु केल्यानंतर त्यात व्हायरस दिसत आहे. त्यामुळे जर या सिस्टिममध्ये प्रवेश केला, तर डाटा नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे एमआयडीसीने सर्व कार्यालयांना कॉम्प्युटर सुरु करु नका, अशी सूचना केली आहे.

हॅकर्सचा शोध सुरु

एमआयडीसीचा सर्व्हर हॅक प्रकरणी सर्व डेटा रिस्टोर करावा. त्याशिवाय याबाबत सायबर सेलकडे तक्रार करावी, असे मत सायबर तज्ञांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान हे हॅकर्स देशातील आहेत की परदेशातील आहेत या संदर्भात अजून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. सध्या त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

एमआयडीसी सर्व्हर हॅक करणारे हॅकर्स हे देशातील आहेत की देशाबाहेरील याचा शोध घेणे सुरु आहे. तसेच, सर्व डेटा रिस्टोर करण्यासाठी सायबर सेलकडे तक्रार करावी, असा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, सर्व्हर हॅक झाल्याने संबंधित यंत्रणा कोलमडल्यासारखे चित्र आहे. त्यामुळे ही प्रणाली पूर्ववत होईपर्यंत कामकाजाची व्यवस्था पर्यायी सुरु करावी अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, प्रादेशिक कार्यालये सुरु करण्यात आली आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का

Mumbai Local : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव डबा