महाराष्ट्र

मंत्री आदित्य ठाकरेंची बैठक सुरू असताना स्लॅब कोसळला…

Published by : Lokshahi News

सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वरील मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेने एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे या दुर्घटनेत थोडक्यात बचावले आहेत.

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यसभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळले. आज संध्याकाळी 4.45 मिनिटांनी सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. अचानक झालेल्या या दूर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दूर्घटना जीवघेणी होती त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे