थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mangal Prabhat Lodha) मालाड मालवणीतील अनधिकृत बांधकामाविरोधात मंत्री मंगल प्रभात लोढा आज मोर्चा काढणार आहेत. मालाड मालवणी येथील अनधिकृत बांधकामाविरुद्ध मोर्चाची हाक देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
आज दुपारी 4 वाजता मालवणी पोलीस ठाण्यावर हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मंत्री लोढांकडून ही मोर्चाची हाक देण्यात आली असून अस्लम शेख यांच्या घराबाहेर नागरिक एकवटणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
मंत्री मंगल प्रभात लोढा काढणार मोर्चा
मालाड मालवणीतील अनधिकृत बांधकामाविरोधात मोर्चा
आज दुपारी 4 वाजता मालवणी पोलीस ठाण्यावर काढणार मोर्चा