थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News) मंत्री पंकजा मुंडेंचे पीए गरजे यांच्या पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. वरळीच्या बिडीडी चाळीतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू असून नुकतेच आठ ते नऊ महिन्यापूर्वी गरजे दांपत्याचा विवाह झाला होता.
मात्र पती यांचे अफेअर चालू असल्याने हा प्रकार झाला असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जात आहे. या प्रकरणी गरजे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए असून त्यांनी त्यांच्या पत्नीला जबर मारहाण केली असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. आत्महत्या की हत्या? असा अंजी दमानिया यांनी सवाल केला आहे.
Summery
मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या
पीए गरजे यांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
वरळीच्या बिडीडी चाळीतील धक्कादायक प्रकार