महाराष्ट्र

TasteAtlas Top 50 Breakfasts : महाराष्ट्राची मिसळ जगात भारी; 'टॉप 50 ब्रेकफास्ट'च्या यादीत मिळवले स्थान

मिसळ प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे.

Published by : Team Lokshahi

(TasteAtlas Top 50 Breakfasts ) मिसळ प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ मिसळ याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून सुप्रसिद्ध फूड गाईड 'टेस्ट अटलास' यांच्या सर्वेक्षणात मिसळचा समावेश जगातील बेस्ट ब्रेकफास्ट डिशेसमध्ये करण्यात आलेला आहे. मिसळला या यादीत 17व्या नंबरवर स्थान मिळाले आहे.

या यादीत मिसळसह भारतातील आणखी दोन लोकप्रिय पदार्थांचा समावेश करण्यात आला असून, छोले भटुरे आणि पराठा हे देखील टॉप 50 यादीत झळकले आहेत. भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृतीला नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवर दाद दिली जाते.

महाराष्ट्र म्हटलं की, खवय्यांच्या डोळ्यासमोर येते मिसळ. कोल्हापूरची झणझणीत मिसळ, पुण्याची साजूक चव असलेली मिसळ, नाशिकची कांदापोह्यांची जोड असलेली मिसळ – प्रत्येक भागाची स्वतःची खासियत आहे. आता याच आपल्या मिसळ डिशला जागतिक दर्जाची ओळख मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक अभिमानाची बाब ठरली आहे.

फूड गाईड 'टेस्ट अटलास' हे दरवर्षी जगभरातील लोकप्रिय खाद्यपदार्थांवर अभ्यास करतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणींमध्ये रँकिंग जाहीर करतात. यंदा त्यांच्या "Top 100 Traditional Breakfast Dishes in the World" या यादीत भारतीय पदार्थांचा ठसा उमटला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा