महाराष्ट्र

Maharashtr Weather : महाराष्ट्रात मिश्र वातावरण! उन्हाळ्यात होणार पावसासह गारपिटीचा मारा

महाराष्ट्र हवामान: पुढील चार दिवस पावसासह गारपिटीचा मारा, उष्णतेच्या लाटेचा अंदाज.

Published by : Prachi Nate

हवामान बदलांचा परिणाम म्हणून जगभरात उष्णतेच्या लाटांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत उन्हाने अंगाची काहिली झाली आहे. उकाडा आणि उन्हाचे चटके यांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मागील काही दिवस मुंबईकरांना उन्हाचा प्रचंड त्रास झाला. मार्च ते मे या तीन महिन्यांत देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवली गेली आहे. मात्र राज्यात आता पुढील चार दिवस नागरिकांना सतर्क होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाचे हवामान तज्ज्ञ के. एस होसाळीकर यांनी ट्विट करत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट परिस्थिती असणार असल्याच ते म्हणाले आहेत. भंडारा आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचसोबत अकोला आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी 27 एप्रिलला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच गारपिटीचाही अंदाज असल्याचं सांगितल आहे. तसेच तर आज दक्षिण कोकणात गडगडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे. विदर्भात 28 पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे आणि नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीत यलो अलर्ट असणार आहे. त्यामुळे आता पुढील चार दिवस राज्यात मिश्र वातावरण अनुभवायला मिळणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते

Chhagan Bhujbal : "मिळालेलं आरक्षण नको आहे का?" छगन भुजबळांचा मराठा समाजाला थेट सवाल!

Uddhav Thackeray On PM Modi : "मोदींच्या मनात पाप असलं तरी मी..." उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका