महाराष्ट्र

आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक, वादग्रस्त बॅनरचा मुद्दा पेटला

Published by : Lokshahi News

अमरावतीच्या वरुड-मोर्शीचे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या एका शुभेच्छा फलकावरून वाद पेटला आहे. बकरी ईदच्या शुभेच्छा पोस्टमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी गाईचे फोटो टाकले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांचा निषेध म्हणून आज वरुड येथील त्यांच्या कार्यालयावर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजपने मोर्चा काढत आमदार देवेंद्र भुयार यांच्या बद्दर घोषणाबाजी केली. आंदोलन कर्त्यानी देवेंद्र भुयार यांच्या घरावर जात त्यांच्या घरासमोर आंदोलन केले.

यावेळी देवेंद्र भुयार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आले तर काही वेळ रास्ता रोको आंदोलन नंतर पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा