महाराष्ट्र

”हातपाय तोडून गळ्यात बांधू” राजू सापतेंच्या आत्महत्येनंतर युनियन्सना मनसेचा इशारा

Published by : Lokshahi News

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते (Raju Sapte) यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. यापुढे कोणताही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, असा धमकीवजा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला.

मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक राजू सापते यांनी पिंपरी-चिंचवडमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत त्यांनी राकेश मोरया असे नाव घेत लेबर युनियनच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती दिली.

याच प्रकरणावर आता अमेय खोपकर आक्रमक झाले आहेत. राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. त्याच्यापाठी कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याविषयी मला बोलायचे नाही. मात्र, भविष्यात कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शकाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा