थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Raj Thackeray) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यातच आता महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.
आज संध्याकाळी 5.30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अखेरच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच राहणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असणार आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उमेदवारांच्या प्रचार फेरीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचार फेरीमध्ये होणार सहभागी