Raj Thackeray 
महाराष्ट्र

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मिरा रोडमध्ये सभा; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

मराठी न बोलल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरातील एका दुकानदाराला मारहाण केली होती.

Published by : Siddhi Naringrekar

(Raj Thackeray) मराठी न बोलल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरातील एका दुकानदाराला मारहाण केली होती. यानंतर 3 तारखेला परिसरातील व्यापाऱ्यांनी याच्या निषेधार्थ मोर्चा काढला. यात जय मारवाडी, जय गुजराती अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

या घटनेमुळे चांगलाच वाद पेटला होता. त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावरुन मिरा रोडमध्ये 8 जुलैला मोर्चा काढण्यात आला होता. मनसे, ठाकरे गट आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने हा मोर्चा काढला होता.आंदोलनादरम्यान मनसैनिकांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात आली होती.

त्यानंतर आज अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मिरा रोडच्या दौऱ्यावर असणार आहेत.राज ठाकरे यांची शांति गार्डनमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे. या सभेतून राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

AstroNURM कंपनीच्या CEO आणि HR प्रमुखाच्या Viral Video मुळे सोशल मीडियावर वादळ

Ayushman Bharat : गरीबांसाठी 5 लाखांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा

Nana Patole : " 'त्या' आमदारावर कारवाई झाली पाहिजे" ; विधानभावनातील राड्यावरुन नाना पटोलेंची मागणी

Latest Marathi News Update live : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल