थोडक्यात
महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे तातडीने मेळावा घेणार
राज ठाकरे यांचा 19 ऑक्टोबरला मेळावा
(Raj Thackeray) मनसे अध्यक्ष राज ठाकरे तातडीने मेळावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे गटाध्यक्ष, पदाधिकारी यांचा उद्या 19 ऑक्टोबरला मेळावा घेणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर महत्त्वाच्या बाबींसंदर्भात राज ठाकरे या मेळाव्यातून मार्गदर्शन आणि सूचना करणार असल्याची माहिती मिळत आहे. हा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला असून सर्व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी हा मेळावा महत्त्वाचा असणार आहे.
मतदार यादीतील घोळ आणि निवडणुकांसंदर्भातील मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी अलीकडेच निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीनंतर आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे आपल्या भाषणात नेमकं काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मनसेची आगामी निवडणुकीसाठीची रणनीती, राजकीय युतीसंदर्भात काय भूमिका घेणार तसेच या मेळाव्यात कोणते मोठे निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.