महाराष्ट्र

Maharashtra Mock Drill Updates : भारत युद्धासाठी सज्ज! महाराष्ट्रात कुठे कुठे सायरन वाजणार? मॉक ड्रिल म्हणजे काय?

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला.

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack ) सध्या तणावाचे वातावरण आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहाशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पाऊलं उचलण्यास सुरवात केली आहे. अशातच आता भारत सरकारकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना उद्या 7 मे रोजी नागरी सुरक्षा मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशभरातील 244 ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.

मॉक ड्रिलमध्ये धोक्याच्या परिस्थितीत, युद्धजन्य परिस्थितीत शत्रू देशांनी हल्ला केल्यास काय करावे, याबद्दल माहिती दिली जाते. याचे नाट्य रुपांतर केलं जातं. आपत्कालीन परिस्थितीत लोक याला कशी प्रतिक्रिया देतात हे पाहिलं जातं. यामध्ये सायरन, ब्लॅक आऊट, एअर स्ट्राईक अलर्ट असे प्रशिक्षण दिले जाते.

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात मॉक ड्रिल होणार?

मुंबई

उरण-जेएनपीटी

ठाणे

पुणे

नाशिक

उरण

तारापूर

रोहा-नागोठणे

मनमाड

सिन्नर

पिंपरी-चिंचवड

छत्रपती संभाजीनगर

भुसावळ

रायगड

थळ-वायशेत

रत्नागिरी

सिंधुदुर्ग

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते