महाराष्ट्र

Modi cabinet expansion : राज्यमंत्र्यांना मागितला राजीनामा

Published by : Lokshahi News

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनं दिल्लीत राजकीय वर्तुळात गाठीभेटी सुरू होत्या. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला असून, आज सायंकाळी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी देण्यात आली असून, शपथविधी सोहळ्याआधी मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चूही देण्यात येत आहे. यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर संतोष गंगवार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

केंद्र सरकारने ८ राज्याचे राज्यपाल बदलत असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर आता केंद्रीय शिक्षणमंत्री हे मोदींच्या मंत्रिमंडळात नसतील. रमेश पोखरियाल निशंक यांनीही मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती सरकारकडे केली आहे.

यातच आता महिला व बाल विकास खात्याच्या राज्यमंत्री देबश्री चौधरी यांना पंतप्रधानांनी राजीनामा देण्यास सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ते बरेली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा