महाराष्ट्र

मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणाची चौकशी SIT मार्फत करणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

Published by : Lokshahi News

खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या दबावातून झाल्याचे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे या प्रकरणातील धागे दोरे समोर येणार आहेत.

मोहन डेलकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये काही नावे लिहिली होती. या सुसाईड नोटमधील काही खुलासे अनिल देशमुख यांनी विधानसभेत केले. यावेळी प्रफुल खेडा पटेल नावाचा उल्लेख केला. प्रफुल खेडा पटेल हे गुजरातचे गृहमंत्री होते. ते डेलकर यांना त्रास देत होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान मोहन डेलकर यांची आत्महत्या ही दबावातून झाली असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. तसेच मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करणार असल्याची घोषणा अनिल देशमुख यांनी केली.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब फडणवीसांनांनी वाचून दाखवला. एटीएस याबाबत तपास करुन सत्य समोर आणेल. त्यांच्याकडे काही पुरावे असेल, तर एटीएसकडे द्यावे. राज्य सरकार योग्य तपास करेल, कोणालाही पाठिशी घालणार नाही. शब्द देतो. जे कागदपत्रे आहेत, ती माझ्याकडे किंवा एटीएस कडे द्या. तपास योग्य होईल असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

सुसाईड नोट सभागृहात फडकवली

तुम्ही जबाब वाचून जर वाझेंच्या अटकेची मागणी करत असाल तर त्याच न्यायाने डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्या लोकांची नावं आहेत, त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी परब यांनी लावून धरत विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीस यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला. फडणवीस यांनी थेट डेलकर यांची सुसाईड नोटच सभागृहात फडकवली. माझ्या हातात डेलकर यांची सुसाईड नोट आहे. यात कोणत्याही पक्षाच्या नेत्याचं नाव नाही. प्रशासकाचं नाव आहे, प्रशासक कुणाच्याही पक्षाचे नसतात. सचिन वाझेंना वाचवण्यासाठी हे करु नये, असं सांगत फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपातील हवा काढून टाकली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rajshree More Apologizes : मराठी विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्रीने अखेर मागितली माफी; Video Viral

Ashish Shelar on Vijayi Melava : "निवडणूकपूर्व जाहिरात...", मुंबईत ठाकरे-राज ठाकरेंच्या मेळाव्यावर आशिष शेलारांचा जोरदार हल्लाबोल

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी ब्राझील दौऱ्यावर! दहशतवाद आणि जागतिक व्यापार अजेंड्यावर चर्चा?

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट