थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chhatrapati Sambhajinagar ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. अखेरच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच राहणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. यातच अनेक ठिकाणी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये पैसे वाटपावरून गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत असून पैसे वाटपाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून प्रभागातील तरुणांनी यादी करणाऱ्या व्यक्तीचे घर शोधलं असून काही तरुणांनी एकत्र येत व्हायरल यादीचे बॅनर लावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यादी करणाऱ्याला जाब विचारण्यात आला असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Summary
छत्रपती संभाजीनगरमध्ये पैसे वाटपा वरून गोंधळ
पैसे वाटपाची यादी सोशल मीडियावर व्हायरल
प्रभागातील तरुणांनी यादी करणाऱ्या व्यक्तीचे घर शोधलं