(Satara School ) सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे काही भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सातारा जिल्ह्यातील पाटण महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातील 334 जिल्हा परिषद शाळांना सुमारे दीड महिन्याची पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
2 ऑगस्ट ला या शाळा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 1 जुलैपासून या शाळांना सुट्टी लागली असून आता 12 ऑगस्टला या शाळा भरणार आहेत.