(Parliament Monsoon Session) आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. 21 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर संसदेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरु होत असून या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’सह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यस्थीचे दावे, बिहारमधील मतदार फेरपडताळणी या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व महत्त्वाच्या मुद्द्यावर नियमानुसार चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. तर महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन करावं,अशी अपेक्षा ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केली आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये 51 राजकीय पक्षाचे 54 सदस्य उपस्थित होते.
विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहांत चर्चेला उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली. त्यामुळे अधिवेशनाचा पहिला आठवडा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.