महाराष्ट्र

Monsoon Update : राज्यातील 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) आगमनाच्या घोषणेनंतरही पावसाच्या सरी बरसण्यास विलंब होत आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या सीमेवर मान्सून थांबला आहे. परंतु, आता राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. येत्या 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता असून राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट (yellow Alert) दिला आहे.

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. यानुसार 19 ते 21 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून 20 व 21 जून या कालावधीत जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी न करण्याचे आवाहन कृषी अधिकारी करत आहेत. खरीपाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यावरच पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Rajendra Gavit : पालघर लोकसभेची उमेदवारी मला नाकारली गेली,त्यामुळे माझ्या दृष्टीने एक दु:खद घटना असं म्हणायला हरकत नाही

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवरून शिवसेना UBT-भाजप ट्विटर वॉर

निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार १० टक्के सवलत

Ravindra Waikar: उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रविंद्र वायकर आज अर्ज दाखल करणार, म्हणाले...

Eknath Shinde on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून मलाही मुख्यमंत्री पदाची ऑफर