अंधेरीत खड्ड्यांविरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अंधेरी एमआयडीसी येथे रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना पोलिसांनी कारवाई करताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.
आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशी मारहाण करणाऱ्या पोलिसांची आणि घटनेची चौकशी करावी अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. तसेच ही शिवशाही आहे का तानाशाही आहे असा टोला हि त्यांनी राज्य सरकारला लगावला . तसेच यापुढे मंत्रालयावर आंदोलन करताना आम्ही लाठ्याकाठ्या घेऊन आंदोलन करायचा का असा सवाल देखील घटनेनंतर अशिष शेलार यांनी उपस्थित केला