MPSC Exam 
महाराष्ट्र

MPSC Exam: 21 डिसेंबरला होणारी MPSCची पूर्व परीक्षा पुढे ढकलली

Prelims Postponed: स्थानिक निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21 डिसेंबरला होणारी MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

स्थानिक निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21 डिसेंबरला होणारी MPSCची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला असून, सुधारित दिनांकांनुसार परीक्षा आता 4 जानेवारी 2026 आणि 11 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या निर्णयाची माहिती आयोगाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.

परीक्षा संदर्भातील तारखांबाबत विद्यार्थी वर्गात गोंधळ आणि उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा आयोजकांकडे स्पष्टता मागितली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने शेवटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी अधिक वेळ मिळणार असून मतमोजणी आणि परीक्षा या दोन्ही कार्यात कोणताही अडथळा येऊ नये असा प्रयत्न करण्यात आला आहे.

आयोगाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान जाणवत असून, पुढील परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी करणे सुरू असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. आयोगने विद्यार्थ्यांना बदललेल्या तारखांनुसार तयारी करण्याचे आवाहन केले आहे

  • 21 डिसेंबरची MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

  • नवीन तारखा 4 आणि 11 जानेवारी 2026 निश्चित झाल्या आहेत.

  • स्थानिक निवडणुकीच्या मतमोजणीमुळे तारखा बदलल्या आहेत.

  • आयोगाने अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करून विद्यार्थ्यांना माहिती दिली.

  • विद्यार्थ्यांना तयारीसाठी अधिक वेळ मिळेल आणि परीक्षा सुरळीत पार पडेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा