महाराष्ट्र

Sharad Pawar : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; शरद पवार ट्विट करत म्हणाले...

पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. नवी पेठ शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. कृषीसेवेच्या 258 पदांचा एमपीएसीत समावेश करण्याची मागणी या विद्यार्थ्यांची असून या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यासोबतच MPSC, IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्यानं परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांच्याकडून ट्विट करण्यात आलं आहे. शरद पवार ट्विट करत म्हणाले की, पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत.

उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार. असे शरद पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक