ST Bus Fare Hike 
महाराष्ट्र

ST Bus Fare Hike : ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार; एसटीची दरवाढ होणार

एसटीच्या तिकिटात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय एसटी महामहामंडळाने घेतला

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • एसटीची दरवाढ होणार

  • एसटीच्या तिकिटात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय एसटी महामहामंडळाने घेतला

  • 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे

ST Bus Fare Hike : एसटीच्या तिकिटात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय एसटी महामहामंडळाने घेतला आहे. आता एसटीने प्रवास करणे महागणार असून प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे. 14 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे. 14 ऑक्टोबर रोजी प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना जुन्या दरानेच तिकिट आकारण्यात येईल.

शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडून इतर बसेससाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Farmer Suicide : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचं भयावह वास्तव;एनसीआरबीचा धक्कादायक अहवाल

Central Government : दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात 3% वाढ

Kalyan School Controversy : शाळेत कपाळावर टिळा, टिकली लावण्यास बंदी; संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे धाव

UPSC Results 2025 : UPSC अंतर्गत IES आणि ISSचा निकाल जाहीर! मोहित अग्रवाल देशात पहिला