Mumbai 
महाराष्ट्र

Mumbai : कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता 'सिंदूर पूल'; आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

दक्षिण मुंबईमधील मस्जिद बंदर येथील कर्नाक पुलाचे नामांतर करून आता त्याचे नाव 'सिंदूर पूल' असे ठेवण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Mumbai) दक्षिण मुंबईमधील मस्जिद बंदर येथील कर्नाक पुलाचे नामांतर करून आता त्याचे नाव 'सिंदूर पूल' असे ठेवण्यात येणार आहे. आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार असून यामुळे गेल्या 10 वर्षांपासून चालत असलेल्या पूर्व आणि पश्चिम मुंबईमधील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

150 वर्ष जुना असलेला हा कर्नाक पूल 2022 मध्ये पाडण्यात आला होता. त्यानंतर बीएमसीकडून मध्य रेल्वेच्या आराखड्यानुसार हा पूल परत नव्याने बांधण्यात आला. मात्र हा पूल तयार झाल्यानंतरही वाहतुकीसाठी खुला न केल्यामुळे शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलनही केले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. हा पूल वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मस्जिद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वाचा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा