महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी भाजप-महायुतीवर थेट हल्ला चढवला. राज्यातील २९ महापालिकांपैकी मुंबईची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी असताना उद्धव ठाकरेंनी ‘भाजपचा मुंबई अदानी यांना विकण्याचा डाव आहे, मुंबई पुन्हा बॉम्बे करण्याचा कट रचला जातोय’ असे आरोप करून उपस्थितांना जागृत केले. मनसे-शिवसेना (ठाकरे गट) युतीच्या या सभेने राजकीय वातावरण आणखी तापले.
भाषणाला सुरुवात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने केली. उद्धव ठाकरेंनी सांगितले, “मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी आम्ही लढलो. संयुक्त महाराष्ट्र समितीचे संस्थापक माझे आजोबा होते. जनसंघ तेव्हा कुठेही नव्हता. गुजरातचा मुंबईवर डोळा होता, मोरारजी देसाईने आंदोलकांवर गोळ्या चालवल्या हा हिंदूच होता. आता भाजप ‘महापौर हिंदूच होईल’ म्हणते, पण इतिहास विसरू नका.” अमर शेखांचे ‘दो कौडी का मोल, मराठा बिकने को तैयार नही’ हे उद्गार आठवताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांना ‘आम्हाला संपूव नये’ असे सांगितले.
भाजप नेते अण्णामलाईंच्या मुंबई दौऱ्याचा उल्लेख करत उद्धव म्हणाले, “मुंबई पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव आहे. आम्हाला महापालिका का हवी? स्पष्ट सांगतो त्यांना मुंबई अदानीच्या घशात घालायची आहे. मुंबईतील प्रदूषण बांधकामांमुळे, ७० टक्के सिमेंट अदानीकडून येते.”
हा दावा उपस्थितांना दाद मिळाली. महायुतीला भाजप-शिवसेना (शिंदे गट) कठीण आव्हान देत ठाकरे युतीने मराठी अस्मितेला केंद्रस्थानी ठेवले. १५ जानेवारीला मुंबईत मतदान होणार असून, या सभेने युतीचे समर्थक उत्साही झाले आहेत. निवडणुकीच्या निकालाने मुंबईतील सत्ता कोणाची होईल, हे ठरेल.