कोकणात शिमगोत्सव साजरा करुन चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र आता सगळ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवासवाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रविवारी महामार्गावर कशेडी ते खारपाडा दरम्यान अवजड वाहनांवर बंदी घातली. मात्र तरीही वाहनसंख्या वाढल्यान वाहतूक कोंडी झाली आहे.
माणगाव ते इंदापूरदरम्यान वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यासाठी प्रवाशांना तब्बल दिड ते दोन तास इतका वेळ लागत होता. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बाह्य वळण रस्त्याची कामे सध्या रखडली आहेत. यासगळ्यांमुळे वाहनचालकांना अरुंद रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.
दोन्ही शहरातून वाहनांना ये जा करावे लागत आहे. अरुंद रस्ता आणि बाजारपेठामधील गर्दी यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने उद्भवत आहे. त्यामुळे दोन्ही बाह्य वळण मार्गांची कामे नवीन ठेकेदार नेमून तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.