राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीविरोधातील याचिकेवर आज कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणार होती. मात्र, कोल्हापूर सर्किट बेंचकडून ही याचिका थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता असून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीच्या याचिकेवर आज कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणार होता. परंतु प्राथमिक कार्यवाही दरम्यान सदर विषयाचं कार्यक्षेत्र (jurisdiction) हे मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रिन्सिपल बेंच अंतर्गत येतं. त्यामुळे या याचिकेची सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंचऐवजी मुंबईतच होणं आवश्यक असल्याचं न्यायमूर्तींनी नमूद केलं. त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचकडून ही याचिका थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्यांनी राज्यपालांनी केलेल्या नियुक्तीला आव्हान देत संविधानिक तरतुदींचा आधार घेत हा मुद्दा न्यायालयासमोर मांडला होता. या प्रकरणात राज्य सरकार आणि राज्यपाल सचिवालयाकडून योग्य प्रक्रिया पाळण्यात आली का, यावर पुढील सुनावणीदरम्यान विचार होणार आहे. कोर्टातील आजच्या निर्णयामुळे आता संपूर्ण खटल्याची पुढील प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रिन्सिपल बेंचमध्येच पार पडणार आहे.
याचिका कोल्हापूर ऐवजी थेट मुंबई उच्च न्यायालयात वर्ग
अधिकारक्षेत्र मुंबई प्रिन्सिपल बेंचमध्ये असल्याचे निरीक्षण
राज्यपाल नियुक्त आमदारांविरोधातील प्रक्रिया पुढे ढकलली
जानेवारीत सुनावणी होण्याची शक्यता