2024 हा वर्ष संपण्यासाठी आणि 2025 सुरु होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. प्रत्येक ठिकाणी थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. नव वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या विशेष लोकल फेऱ्या 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत.
31 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान दोन आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल या दरम्यान दोन अशा चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार स्थानकांच्या दरम्यान आठ फेऱ्या लाचवण्यात येणार आहेत.
चर्चगेट ते विरार अशा धावणार लोकल
1 जानेवारी - चर्चगेट येथून मध्यरात्री 1.15 वाजता रवाना होणार आणि 2.55 वाजता विरारला पोहोचणार
1 जानेवारी - चर्चगेट येथून मध्यरात्री 2 वाजता रवाना होणार आणि 3.40 वाजता विरारला पोहोचणार
1 जानेवारी - चर्चगेट येथून पहाटे 2.30 वाजता रवाना होणार आणि 4.10 वाजता विरारला पोहोचणार
1 जानेवारी - चर्चगेट येथून पहाटे 3.25 वाजता रवाना होणार आणि 5.05 वाजता विरारला पोहोचणार
विरार ते चर्चगेट अशा धावणार लोकल
1 जानेवारी - मध्यरात्री 12.15 वाजता विरार येथून लोकल सुटणार आणि 1.52 वाजता चर्चगेट येथे पोहोचणार
1 जानेवारी - मध्यरात्री 12.45 वाजता विरार येथून लोकल सुटणार आणि 2.22 वाजता चर्चगेट येथे पोहोचणार
1 जानेवारी - मध्यरात्री 1.40 वाजता विरार येथून लोकल सुटणार आणि 3.17 वाजता चर्चगेट येथे पोहोचणार या सर्व ट्रेन्स सर्व रेल्वे स्टेशन्सवर थांबणार आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वेच्या ट्रेनचे वेळापत्रक
1 जानेवारी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटणार आणि पहाटे 3 वाजता कल्याण येथे पोहोचणार
• 1 जानेवारी - कल्याण येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटणार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3 वाजता पोहोचणार
• 1 जानेवारी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटणार आणि पहाटे 2.50 वाजता पनवेल येथे पोहोचणार
• 1 जानेवारी - पनवेल येथून मध्यरात्री 1.30 वाजता ट्रेन सुटणार आणि 2.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार