BMC Election 
महाराष्ट्र

BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका 227 प्रभागांनुसार होणार; सरकारकडून प्रभागरचनेचे आदेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(BMC Election ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. चार महिन्यांत महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

यासाठी आता राज्य सरकार कामाला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश नगरविकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत. नगरपालिका , नगर पंचायतींच्या प्रभाग रचनेचे स्वतंत्र आदेश देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

नगरविकास मंत्रालयाने महापालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश जारी केले असून, मुंबईमध्ये 227 एकसदस्यीय प्रभाग असतील आणि इतर महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग असतील. अशी माहिती मिळत आहे. त्यानुसार आता नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी यांच्यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग असतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?